उस्मानाबाद / प्रतिनिधी

जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील लाखनगाव येथील रहिवाशी असलेल्या प्रियंका चंद्रहंस गुरव हिच्या चित्रकलेतील कौशल्याचे चित्रट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते नागराज मंजुळे यांनी कौतुक केले. प्रियंका ही माईर्स एमआयटीच्या श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयातील दहावीची विद्यार्थिनी आहे.

 प्रियंका गुरव हिने पेन्सिलने काढलेले स्केच नागराज मंजुळे यांना भेट दिले. यावेळी  प्रियंका हिच्या चित्रकलेतील कौशल्याचे मंजुळे यांनी कौतुक केेले. तिच्या चित्रकलेच्या आवडीबाबत त्यांनी उत्सुकतेने सुमारे अर्धा तास चर्चाही केली. यावेळी नागराज मंजुळे यांनी प्रियंका गुरव हिचा पुष्पगुछ देऊन सत्कार करून तिची चित्रकला आणखी बहरत जावो अशी सदिच्छा व्यक्त केली.

 प्रियंका हिने आजपर्यंत अनेक सामाजिक, राजकीय, शासकीय, कलाकार अशा विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींचे स्केच काढून त्या-त्या व्यक्तींना भेट दिले आहेत.


 
Top