उस्मानाबाद / प्रतिनिधी-

ऑल इंडिया मोबाईल रिटेलर असोसिएशन (Aimra) चा सातवा वर्धापन दिवस 11 सप्टेंबर रोजी उस्मानाबाद मधील मोबाइल व्यावसाईकांनी आपली दुकाने आकर्षक रित्या फुगे लावून सजवली होती त्याच प्रमाणे केक कापून हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

या दिनानिमित्त व्यावसायिक हित , सामजिक उपक्रम याबद्दल कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमासाठी Aimra उस्मानाबादचे पदाधिकारी श्री सलीमभाई काझी, श्री विशाल वैद्य,  श्री वीरेंद्र अब्दारे, श्री विजयसिंह डोके, श्री शेहबाज शेख तसेच सर्व एमरा सदस्य श्री चंद्रकांत कानडे सर ,श्री मोईनभाई काझी, श्री समीर सय्यद, श्री अमोल गोंडगिरे, श्री गजानन विभूते व सर्व उस्मानाबाद येथील मोबाइलला व्यापारी यांची प्रमुख उपस्थिती होती.एमरा या संघटनेने लोकडाऊन काळात आपल्या कुटुंबातील मोबाइलला व्यावसायिकांचे हित  जोपासले शिवाय सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा संकल्प केला.

या दिनानिम्मित 11 सप्टेंबर ला एमरा तर्फे आयोजित भव्य रक्तदान शिबिर, पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपन, गरजू लोकांना अन्नदान , वस्त्रदान अशे उपक्रम संपूर्ण देशात एकाच दिवशी राबवण्यात आले. त्याच प्रमाणे 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता सुमारे 25000 मोबाइल व्यावसायिकांना राष्टीय मार्गदर्शकांद्वारे डिजिटल अँप वर आभासी मार्गदर्शन करण्यात आले,अशी माहिती एमरा उस्मानाबादचे अध्यक्ष श्री विशाल वैद्य यांनी दिली. 

 
Top