कळंब / प्रतिनिधी-

 शहरातील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील ग्रंथालयाला इयत्ता १० वी चा पुस्तक व नवनीत संच लाल बहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालय  धानोरा शेळका या शाळेची माजी विद्यार्थिनी कुमारी सपना दिनकर भालेराव व तिचे पालकत्व स्वीकारणारे श्री शैलेंद्र विश्वनाथ चव्हाण यांनी भेट दिला.

कुमारी सपना दिनकर भालेराव हिने इयत्ता ११ वी साठी कला शाखेत सावित्रीबाई फुले उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश घेतला आहे. ती अत्यंत हुशार व जिज्ञासू विद्यार्थिनी आहे. तिच्यामध्ये सामाजिक उपक्रम राबवण्याची क्षमता आहे. तिने दिलेल्या पुस्तकाचा  संच याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मनोरमा ताई भवर  (शेळके),सचिव चत्रभुज भवर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. जयचंद कुपकर, श्री.अनिल शेळके,  श्रीमती प्रतिभा  गांगर्डे, श्रीमती सुलभा शिंदे(मु.अ.समर्थ प्राथमिक शाळा कळंब) श्रीमती शितल शिंदे मँडम तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

 
Top