तुळजापूर / प्रतिनिधी-

 महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सव सन २०२१ या वर्षाच्या  यात्रा नियोजन व अनुदान यासंदर्भात नियंत्रण अधिकारी नियुक्ती करणे किंवा नाही याबद्दल दुमत नाही परंतु नवरात्र महोत्सव यात्रा अनुदान हे जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर समितीचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रणाखाली केले जात असते मात्र  यात्रा पुजारी बांधव, भाविक भक्त तसेच शहराच्या विकासात्मक धोरणासंदर्भात काही नगरसेवकांना कसल्याही प्रकारचे देणे-घेणे नसून केवळ विरोधाला विरोध म्हणून तक्रारी अर्ज देण्याचे काम करत असतात विरोधाला विरोध न करता तुळजापूर शहरात येणाऱ्या भाविकांना सेवा सुविधा देने, पुजारी बांधव शहराच्या विकासात्मक धोरणासाठी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत बैठकीत उपस्थित राहून आपले मत व्यक्त करता येऊ शकले असते परंतु काही नगरसेवक बैठकीत उपस्थित न राहता तक्रारी अर्ज देण्याचेच काम करत असतात शहराच्या विकासासाठी नगरसेवकांनी पुढे यावे, असे मत तुळजापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी आपले मत व्यक्त केले. 

  शारदिय नवरात्र महोत्सव यात्रा अनुदान, निवेदा प्रक्रियेवर नियंत्रण अधिकारी नियुक्त करण्यात यावे यामागणीचे निवेदन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे आध्यक्ष तथा  जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना दिले होते. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी आपले मत व्यक्त केले.


 
Top