परंडा / प्रतिनिधी : -

तालुक्यातील अनाळा येथे दहा दिवशीय शेळीपालन प्रशिक्षणाचा प्रारंभ दि.१८ रोजी करण्यात आला.भारतीय स्टेट बँक ग्रामिण स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्था, उस्मानाबाद व स्वयंम शिक्षण प्रयोग संस्था , उमेद अभियान उस्मानाबाद यांच्या वतीने हे प्रशिक्षण आयोजीत केले आहे.या प्रशिक्षणाचे उद्घाटन स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेचे जिल्हा समन्वयक किरण माने व अनाळ्याच्या सरपंच अंबिका जोतिराम  क्षिरसागर यांच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आले. 

या दहा दिवशीय प्रशिक्षणा साठी ३० महिलांना सुरक्षाकिट ,उद्योजकता वही, पेन, मास्क आदि साहित्य संस्थेचे विकास गोफणे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले .प्रशिक्षणामध्ये महिलाना शेळीपालन, गांडुळ बेड उभारणी, बायोगॅस ‘लघु उदयोग याविषयी विविध मान्यवरांच्या वतीने मार्गदर्शन करण्यात येणार असून या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे समन्वयक विकास गोफणे यांनी सांगितले. स्वयंम शिक्षण प्रयोगचे समन्वयक किरण माने यांनी महिलांना अनमोल मार्गदर्शन केले व प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आपला विकास साधावा असे आवाहन केले. प्रशिक्षणासाठी अनाळा, रोहकल , साकत [ खु ] साकत [ बु ] , पिस्तमवाडी, मलकापूर, पिंपरखेड , इनगोदा आदी गावातील महिला सहभागी झाल्या आहेत . कार्यक्रमासाठी स्वयम शिक्षण प्रयोगच्या भूम - परंडा - वाशी समन्वयक  सीमा सय्यद , नौशाद शेख , पल्लवी माने , उमेद सल्लागार गणेश नेटके, गणेश चव्हाण, जवळा प्रभाग समन्वयक विजय गवळी आदीची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गणेश चव्हाण यांनी केले . प्रशिक्षणाचे उत्तम नियोजन  नौशाद शेख यांनी केले.

 
Top