परंडा / प्रतिनिधी  - 

परंडा तालुक्यातील धोत्री येथील जिल्हा परिषद शाळेला विभागीय आयुक्त  यांच्या संकल्पनेतून मराठवाडा विभागात राबविलेल्या “सुंदर माझी शाळा” पुरस्कारासाठी निवड झाली होती.दि.१७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जिल्हा परिषदेने यशवंतराव चव्हाण सभागृहात जि.प अध्यक्षा अस्मिता कांबळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत “सुंदर शाळा स्वच्छ शाळा” हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

“सुंदर माझी शाळा” हा पुरस्कार जिल्हास्तरावर परंडा तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या धोत्री शाळेला मिळाला.धोत्री हे गाव परंडा तालुक्याचे दुर्गम व शेवटचे टोक म्हणून ओळखले जाते.दुर्गम व डोंगराळ भागात असणाऱ्या धोत्री शाळेने परसबाग,शालेय रंगरंगोटी,वृक्षारोपण आणि संगोपन,स्पर्धा परीक्षेची तयारी,विविध गुणवत्तापूर्ण कार्यक्रम असे विविध उपक्रम राबवले आहेत.

    शाळेचा सर्वांगीण विकास व्हावा व शिक्षक व विद्यार्थी यांची गैरसोय होऊ नये म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंबादास जाधव यांनी स्वखर्चातून शाळेत पिण्याच्या पाण्यासाठी बोर ची व्यवस्था करून दिली. गावचे सरपंच पांडुरंग देवरे यांनी गावातील नागरिकांच्या व ग्रामपंचायतीच्या सहकार्याने लोकवाटा गोळा करून शाळा सुंदर करण्यासाठी परिश्रम घेतले.

दुर्लक्षित क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओसाड जागेत मुलांमध्ये रमून शाळेचे नंदनवन करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक किशोर नरसिंगे, आनंद गायकवाड, परमेश्वर सगट,महानंदा गव्हाणे इ.शिक्षकांनी परिश्रम घेतले.

अंगणवाडी शिक्षिका,मदतनीस, ग्रामसेवक विठ्ठल गोस्केवार शा. व्य. स अध्यक्ष अंबादास जाधव,उपाध्यक्ष अर्जुन देवरे व सर्व सदस्य,सर्व पालक यांनी मोलाचे सहकार्य केले.

गटशिक्षणाधिकारी जगदाळे मॅडम,विस्तार अधिकारी खुळे साहेब,केंद्रप्रमुख शिंदे साहेब आदीनी सर्व शिक्षकवृंदाचे व ग्रामस्थांचे अभिनंदन केले.


 
Top