तुळजापूर / प्रतिनिधी-

तालुक्यातील शिराढोण येथील तरुण  शेतक-याचा संर्पदंशाने मुत्यु झाल्याची घटना शुक्रवार दि. 3 रोजी सकाळी १०.३० वा. सुमारास घडल्याने सर्वञ खळबळ उडाली आहे. मयत तरुण शेतकरी हा  शिराढोण (ता.तुळजापूर ) येथील असुन त्याचे नाव राजेंद्र नागनाथ सुरवसे ( 23 ) आहे.

 राजेंद्र याचा पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे, राजेंद्र  श्रीतुळजाभवानी मंदीरात खाजगी सुरक्षा कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून कामाला होता. राजेंद्र हा झोपला असता शुक्रवार पहाटे साडेतीनच्या सुमारास त्यास संर्पाने दंश केला असता त्यास तुळजापूर येथील रुग्णालयत आणले त्याची प्रकृती गंभीर बनल्याने त्यास उस्मानाबाद येथे खाजगी रुग्णालयात नेत असताना तो मयत झाला .

 
Top