मुरूम / प्रतिनिधी

 नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने  मराठी विषयात प्रियंका हिरेमठ-कबाडे यांना नुकतीच पीएच. डी. पदवी प्रदान केली.  कबाडे यांनी भाषा संकुलातील प्राध्यापक डॉ. पी. विठ्ठल यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संत मन्मथ स्वामी यांच्या वाङ्मयातील सामाजिक आणि तत्त्वज्ञानात्मक विचार एक चिकित्सक अभ्यास या विषयावर शोधप्रबंध विद्यापीठास सादर केला होता. त्यांची नुकतीच या विद्यापीठात मौखिक परीक्षा झाली. 

यावेळी बाह्य परीक्षक म्हणून चंद्रपूर येथील प्राध्यापिका डॉ. पद्मरेखा धनकर उपस्थित होत्या. यावेळी भाषा संकुलन संचालिका प्राध्यापक डॉ. शैलजा वाडीकर, मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. केशव देशमुख, प्राध्यापक डॉ. पृथ्वीराज तौर, डॉ. वैजनाथ अनमुलवाड, डॉ. चंद्रकांत बाविस्कर, अनिल स्वामी, पंडित शिवाप्पा खके गुरुजी, भूषण स्वामी, विद्यापीठ सिनेट सदस्य विक्रम पतंगे आदींची उपस्थिती होती. युवराज पाटील, डॉ. विनायक येवले, प्रा. प्रेमानंद शिंदे, डॉ. शशिकांत दरगू, प्राध्यापिका ज्योती स्वामी, डॉ. श्यामा घोणसे, स्वाती साखरकर, सिद्धमल्लय्या हिरेमठ, प्राध्यापक मनोहर धोंडे, प्राचार्य डॉ. प्रशांत गवळी, प्राचार्य नागनाथ पाटील, प्राचार्य डॉ. रामचंद्र इप्पर, सुनिल कबाडे, लासीनमठाचे मठाधिपती करबसव शिवाचार्य महाराज, थोरला मठसंस्थानचे मठाधिपती दिगंबर शिवाचार्य महाराज तसेच त्या श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आहेत. या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, डॉ. महेश मोटे, डॉ. केशव कुलकर्णी, डॉ. शिवपुत्र कनाडे, डॉ. शीला स्वामी आदींनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.

 
Top