उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तालुक्यातील  समुद्रवाणी येथे प्रहार अपंग क्रांती आंदोलन  संघटनेच्या 100 व्या शाखेचे उद्घाटन  उत्साहात संपन्न झाले. या शाखेचे उदघाटन प्रहार संघटनेचे जिल्ह्यध्यक्ष मयुर काकडे यांच्या हस्ते संपन्न झाले.

दरम्यान शाखेच्या अध्यक्षपदी सिद्राम पवार,उपाध्यक्षपदी विनोद सावंत,सचिवपदी सय्यद तेंबीकर ,उपसचिवपदी दीपा अवतारे तर सदस्यपदी बालाजी जोगी,पूजा ढवळे, रामलिंग कलबंडे, बालाजी कावळे,उत्तम पाटील ,निसार शेखव इतर दिव्यांग बंधू भगिनी यांची निवड करण्यात आली.

या उद्घाटन कार्यक्रमास यावेळी उपसरपंच रामभाऊ गवाने,  जिल्हासंघटक बाळासाहेब कसबे, नवनाथ मोहित,  बाळासाहेब पाटील,  शिवाजी पोतदार जमीर शेख,बाबासाहेब भोईटे, दिनेश पोतदार,सबदार सय्यद,इस्माईल शेख,इरफान वस्ताद आदींची उपस्थिती होती. 

 
Top