परंडा / प्रतिनिधी : - 

येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे.शिंदे महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाचे प्राध्यापक  विलास लिंबराज गायकवाड रा.मुगाव ता.परंडा यांची नुकतीच माळी सेवा संघाच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

 माळी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा प्रदेशाध्यक्ष दत्तात्रेय माळी, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाताई चाकणकर ,महाराष्ट्र राज्याचे सचिव अजय मगर, महाराष्ट्र राज्याचे संपर्कप्रमुख बिभीषण खुणे आणि महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष बालाजी माळी यांनी प्रा.विलास गायकवाड यांची सामाजिक क्षेत्रातील आवड आणि माळी समाजाच्या सेवेबद्दल ओढ लक्षात घेता माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य या समाज सेवेसाठी व समाज संघटन करण्यासाठी त्यांची उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.

  प्रा.विलास गायकवाड हे भाजपा युवा मोर्चाचे माजी तालुका अध्यक्ष होते , सध्या भाजपाचे युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष, भाजपाचे तालुका कोषाध्यक्ष आणि खाजगी शिक्षक सोसायटीचे संचालक म्हणून काम पाहत आहेत .त्यांच्या या निवडीबद्दल आमदार सुजितसिंह ठाकूर , नगरसेवक सुबोधसिंह ठाकुर, परंडा येथील समन्वयक अनिल जानराव, परंडा शहरातील उमाकांत गोरे ,शिवाजी मेहेर, ऍड .अवसरे भालचंद्र तसेच रा. गे. शिदे महाविद्यालयातील प्राचार्या, प्राध्यापक, कर्मचारी व परंडा तालुका, उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक मित्र परिवारांनी प्रा.गायकवाड यांच्या निवडीबद्दल अभिनंदन केले.

 
Top