वाशी / प्रतिनिधी- 

तालुक्यातील मांडवा ग्रामपंचायत मध्ये ७३ वा. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिवस  (हैद्राबाद मुक्ती संग्राम) ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला. डॉ सौ योगिनी संजय देशमुख,सरपंच ग्रामपंचायत मांडवा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या वेळी उपस्थित जेष्ठ नागरिक श्री तुकराम पाटील, श्री बाबासाहेब देशमुख,समाधान  देशमुख, श्री जोगदंड ,आरोग्य कर्मचारी,आशावर्कर,अंगणवाडी  सेविका,  शिक्षीका ,लिंबराज निकम ,हरीभाऊ  कोळी   ग्रामपंचायत कर्मचारी होते.

ग्राम वेस नवनिर्माणाचे काम शुभारंभ झाल्याचे सांगून ग्रामवेस नव निर्माण काम ५० दिवसात पूर्ण होणार असल्याचे  ग्रामस्थांच्या वतीने सांगितले.यासोबत मांडवा गावचा ऐतिहासिक वारसा जपणूक म्हणून कोकनाथ महादेव मंदिर जीर्णोद्धार व मारुतीचा पार देखील ग्रामस्थ  बांधणार   आहेत .

या कामाला स्वेच्छेने देणगी देऊन सहकार्य् करण्याचे अवाहन सरपंचांनी केले.

 
Top