उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 ऑल इंडिया पॅथर सेना उस्मानाबाद जिल्हा कार्यकारीनीच्या वतीने जिल्हा आढावा बैठक शासकीय विश्रामगृह उस्मानाबाद येथे घेण्यात आली.या आढावा बैठकीमध्ये विविध विषयांवर चार्चा करण्यात आली. प्रामुख्याने गाव तिथे शाखा उभारण्यात यावी या विषयावर भर देण्यात आला. या आठावा बैठकीमध्ये कानेगाव येथील बुध्द विहार काही कारणास्तव गावांतील गावगुंडानी बंद करून कुलुप लावण्यात आले आहे.ते उघडण्यासाठी 14 ऑक्टोबर 2021 रोजी धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाऊ केदार यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने बुध्द विहार बचाव आंदोलन उभारण्यात येणार आहे .तसेच डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा ,विद्यापीठ कमान ,तुळजापुर येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी. पुढील या विषयाला धरून उस्मानाबाद येथे मोठ्या संख्येने आंदोलन व मोर्चा काढण्या संदर्भात ठराव करण्यात आला. 

या बैठकीला  प्रमुख उपस्थीती मराठवाडा कार्याध्यक्ष चंद्रमुणी गायकवाड, जिल्हाध्यक्ष धनंजय हुंबे, युवक जिल्हाध्यक्ष यशपाल गायकवाड, ग्रामीण जिल्हाध्यक्ष अशोक कसबे यांनी बैठकीला मार्गदर्शन केले, या बैठकीला उपस्थित:- आनंद गाडे युवा नेते,चेतन पांडागळे, तुळजापुर तालुका अध्यक्ष, भैय्यासाहेब वाघमारे, अमोल शिंदे जि.सरचिटणीस, रोहित सोनवणे,श्रीराम पाटील, प्रकाश लगाडे,संदिप सरवदे, धीरज शिंदे, कुणाल रोंगे,महादेव जेटीथोर,प्रशांत हजारे  अनेक पदाधिकारी आणी कार्यकर्ते उपस्थितीत होते.


 
Top