परंडा / प्रतिनिधी-

भारतीय जनसंघाचे संस्थापक, प्रखर राष्ट्रभक्त, एकात्म व मानवतावादाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती शनिवार (दि.२५) साजरी करण्यात आली.

आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या जनसंपर्क कार्यालयात दिनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हा संघटन चिटणीस विकास कुलकर्णी, तालुका चिटणीस सुजित परदेशी, भाजपाचे नेते उमाकांत गोरे, सरपंच शरद कोळी, युवा नेते सारंग घोगरे, साहेबराव पाडूळे, श्रीकृष्ण शिंदे, शंकर घुबडे, सूरज काळे, विलास खोसरे, राहुल फले, नागेश गर्जे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top