परंडा / प्रतिनिधी : - 

गेल्या चार दिवसा पासून शहर व परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे खासापुरी धरण व चांदणी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.तर सिना - कोळेगाव प्रकलात ही पाणी साठ्यात वाढ होत आहे.तर देवगाव खुर्द येथील शेतकरी नदी काठच्या पात्रात बुडून मृत्यू पावला आहे.

  मागील पंधरा दिवसात खासापुरी धरणाच्या क्षेत्रात चांगला पाऊस झाला होता.भूम तालुक्यात झालेल्या पावसामुळे खासापुरी धरणात पाणी साठा झाला होता. त्यानंतर शनिवारी दि.४ रोजी रात्रौ मुसळधार पावसाला सुरुवात झाली.रात्रभर पाऊस सुरू होता.त्यामुळे खासापुरी ,चांदणी मध्यम प्रकल्पाचे २४ दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.परंडा शहराला पाणीपुरवठा करणारे खासापुरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.तसेच तालुक्या साठी वरदान असलेल्या सिना - कोळेगाव प्रकल्पात सोमवार दि.६ रोजी सांयकाळी संगोबा बंधारात पाणी आल्याने व गेल्या चार दिवसाच्या सततच्या पावसामुळे सिना - कोळेगाव प्रकल्पात पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. तसेच मंगळवार दि.७ रोजी सायंकाळी नदी काठच्या देवगाव खुर्द येथील शेतकरी आपल्या शेतातील ई.मोटार काढण्यासाठी गेलेल्या हनुमंत काटे वय (२७) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

 
Top