उस्मानाबाद / प्रतिनिधी : -

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे हिंदी अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष तसेच रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे माजी हिंदी विभाग प्रमुख डाॅ. देविदास इंगळे यांच्या सेवा गौरव समारंभाचे नुकतेच उस्मानाबादेत आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उस्मानाबाद चे प्रथम नगराध्यक्ष नानासाहेब पाटील हे होते.

या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय हिंदी सेवी संस्था महासंघाचे उपाध्यक्ष डॉ चंद्रदेव कवडे, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे हिंदी विभागाचे प्रोफेसर सुधाकर शेंडगे, कोल्हापूर येथील शिवाजी विश्वविद्यालयाचे प्रोफेसर अर्जुन चव्हाण, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य डॉ गोविंद काळे तसेच रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जयसिंगराव देशमुख इत्यादी उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ देविदास इंगळे यांच्या अध्यापकीय सेवेबद्दल त्यांचा सपत्नीक मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सेवा गौरव समारंभाच्या निमित्ताने साहित्य साधना या गौरव ग्रंथाचे ही प्रकाशन करण्यात आले. या गौरव ग्रंथाचे साठी महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले जवळपास 80 लेख प्रकाशित करण्यात आले.

शिक्षकाच्या अशा या गौरवा बद्दल मान्यवरांनी कौतुकाचे शब्द काढले. यावेळी प्राचार्य जयसिंगराव देशमुख प्रो गोविंद काळे , प्रो सुधाकर शेंडगे,  प्रो चंद्रदेव कवडे, प्रो. अर्जुन चव्हाण इत्यादींनी आपली मनोगते व्यक्त केली.  डॉ. देविदास इंगळे यांनीही या सत्काराला उत्तर देत कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रो अशोक मर्डे यांनी केले तर आभार डॉक्टर विनोद कुमार वायचळ यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ मीना जाधव यांनी केले. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने शिक्षक प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

 
Top