तुळजापूर / प्रतिनिधी-

 आगामी नवरात्र महोत्सवाचा पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक नीवा जैन यांनी शुक्रवारी (दि. २४) तुळजाभवानी मंदिरासह शहरात प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या वेळी मंदिराचे एन्ट्री पॉइंट-एक्झिट पॉइंट सह मंदिर परिसर, होमकुंडाची पाहणी केली. नवरात्रातील मानाच्या पलंग - पालखी, काठ्यांच्या मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. शहराबाहेर भाविकांना रोखण्याचे पॉइंट यावेळी निश्चित करण्यात आले.

तुळजाभवानी मातेचा वर्षातील सर्वात मोठा उत्सव शारदीय नवरात्र महोत्सव ७ ऑक्टोबरपासून साजरा करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसर्या वर्षी नवरात्र महोत्सव भाविकांशिवाय साजरा करण्यात येणार असला तरी नवरात्रातील सर्वच धार्मिक विधी मोजक्याच पुजारी, सेवेकरी व मानकऱ्यांचा उपस्थितीत परंपरे प्रमाणे होणार आहेत. या पार्श्वभूमीवर नुतन जिल्हा पोलीस अधीक्षक नीवा जैन यांनी तुळजाभवानी मंंदिरात भेेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.  सकाळी ११ ते दुपारी ०२ वाजे पर्यंत चाललेल्या या पाहणीत अतिरिक्त पोलीस अधीक्षक, तहसीलदार सौदागर तांदळे, व्यवस्थापक तहसीलदार योगिता कोल्हे, पोलिस निरीक्षक आजिनाथ काशिद, मंदिर संस्थानचे धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले, नगर पालिकेचे अभियंता प्रशांत चव्हाण आदींची उपस्थिती होती.

 
Top