उमरगा / प्रतिनिधी

 तालुक्यातील येणेगूर येथील दोन मुलींचा डेंग्युसदृश्य आजाराने मृत्यू झाल्याची घटना ताजीच असताना शहरातील गरोदर महिलेचा शुक्रवारी (दि. २४) सकाळी उपचार सुरू असताना मृत्यू झाला. शहरातील भारतनगर येथील मसणजोगी वस्तीत दोन दिवसापूर्वी डेंग्यू सदृश्य आजाराची लागण झाल्यामुळे गरोदर महिला यल्लम्मा साईनाथ मुळे यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्थिती चिंताजनक असल्याने त्यांना लातूरच्या जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. तालुक्यातील येणेगुर येथे दोन मुलींचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच हा प्रकार घडला.


 
Top