परंडा / प्रतिनिधी  -  

चालू आर्थिक वर्षांमध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजना व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने साठी अनुसुचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकर्याने नवीन विहीर अनुदानासाठी अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

नवीन विहीरीसाठी २ लाख ५० पन्नास हजार अनुदान अनुज्ञेय आहे. यासाठी शेतकर्याकडे सक्षम प्राधिकरण कार्यालयाने दिलेले जात प्रमाणपत्र असले पाहीजे. त्या शेतकर्याच्यां नावे किमान.०.४० हे.जमीन असणे आवश्यक आहे. 

विहीर व्यतिरिक्त इतर घटकांसाठी किमान ०.२० हे. जमीन आवश्यक आहे. या योजनेत कमाल शेत जमिनीची अट ६.०० हे इतकी आहे.शेतकर्याच्या नावे जमीन धारणेचा ७|१२ व ८ अ चा उतारा असणे आवश्यक आहे. ( नगरपंचायत, नगरपालिका व महानगरपालिका क्षेञा बाहेरील ) शेतकर्याकडे आधार कार्ड, बॅंकेचे राष्ट्रीयकृत बॅंक पासबुक आणि हे खाते आधार कार्डाशी संलग्न असणं आवश्यक आहे. शेतकर्याचें सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न दीड लाख रू.पेक्षा कमी असावे.

विहीर दुरूस्ती ५० हजार, विद्युत पंप २० हजार, विज जोडणी १० हजार, इनवेल बोअर २० हजार, इ. या अनुदान अनुज्ञेय आहे. शेतकर्याकडून ऑनलाईन अर्ज या संकेतस्थळावर उपल्बध आहे.  WWW.Mahadbtmahait.gov.in  या योजनेचा लाभ जास्तीत जास्त अनु.जाती, अनु.जमातीच्यां शेतकर्यानीं या योजनेचा लाभ अवश्य घ्यावा.  

 
Top