उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद येथील सिद्धिविनायक परिवार व उद्योग समुहाने यशस्वी वाटचाल करीत तुळजापूर तालुक्यातील देवकुरळी येथील श्री सिध्दीविनायक ॲग्रीटेक इंडस्ट्रीज लिमिटेड या कारखान्याचा मिल रोलर पूजनाचा समारंभ उत्साहात संपन्न झाला.

श्री सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक दत्ता भाऊ कुलकर्णी व जिल्हा परिषद सदस्य वसंत वडगावे, प्रदेश कार्यकारणी सदस्य ॲड.अनिल काळे व जिल्हा विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड.नितीन भोसले यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून तुळजापूरनगरीचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी, श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेटचे अध्यक्ष व्यंकटेश कोरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विक्रम देशमुख,तुळजापूर भाजपा तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, सत्यवान सुरवसे, आनंद कंदले, विशाल रोचकरी, प्रभाकर मुळे,सत्यवान सुरवसे, साहेबराव घुगे, दत्ता राजमाने,प.स.सदस्य चित्तरंजन सरडे, प.स.सदस्य शिवाजी साठे, प.स.सदस्य पिंटू कळसुरे, नांदुरी सरपंच मोहन मुळे, उपसरपंच हनुमंत जाधव, देवकुरुळीचे सरपंच राहुल कलाटे, अनिल जाधव, नागेश चौगुले, बाबा बेटकर, शिवाजी शिंदे, विजय रोकडे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमास श्री सिध्दीविनायक ॲग्रीटेक इंडस्ट्रीज लिमिटेड चे कर्मचारी व सिध्दीविनायक परिवाराचे हितचिंतक व परिसरातील शेतकरी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना दत्ता भाऊ कुलकर्णी यांनी कारखान्याच्या जडणघडणीचा लेखाजोखा मांडला व तुळजापूर तालुक्यातील व परिसरातील शेतकऱ्यांची निकड लक्षात घेऊन या भागात कारखाना उभारण्याचा संकल्प केल्याचे सांगितले व ऑक्‍टोबर महिन्यात मोळी पूजनाचा कार्यक्रम घेण्याचा निश्चय व्यक्त केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड प्रतीक देवळे यांनी केले तर आभार प्रदर्शन बालाजी शिंदे यांनी व्यक्त केले.

 
Top