उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शहरातील समता नगर येथील सेवानिवृत्त नायब तहसीलदार अब्दुल करीम खान (वय 72) यांचे शुक्रवारी (दि.10) सकाळी साडेआठ वाजता अल्पशा आजाराने सोलापूर येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उस्मानाबाद शहरातील दर्गाह परिसरात शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास दफनविधी करण्यात आले. 

यावेळी नातेवाईक, मित्र परिवार उपस्थित होते. त्यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे. डॉ. इलियास खान व दैनिक एकमत कार्यालयातील डीटीपी ऑपरेटर इद्रिस खान यांचे ते वडील होते.

 
Top