उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जगातील सर्वात मोठया राष्ट्रीय पक्षात म्हणजे भारतीय जनता पार्टीत प्रभाग क्र 1 मधील तेरणा कॉलेज परिसरातील सेवालाल कॉलनी  मधील असंख्य युवकांनी भारतीय जनता पार्टीचे नेते तथा, तुळजापुर विधानसभा आमदार लोकनेते राणाजगजितसिंह पाटील व भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते, अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

 येणाऱ्या काळात पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनात युवा पिढी देशाच्या विकासासाठी भरीव योगदान देऊ शकेल तसेच एक सक्षम आत्मनिर्भर युवा होण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा कटिबद्ध आहे .

 या प्रवेश प्रसंगी भाजपात प्रवेश केलेले नितीन राठोड, अमोल राठोड, लहू चव्हाण, राहुल पवार, अजित गायकवाड, प्रदीप एडके, पंडित कांबळे, किरण पवार यांच्यासह अनेक युवकांनी प्रवेश केला. या प्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस ॲड. नितीन भोसले, भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, शहराध्यक्ष राहुल काकडे, एस.सी.मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रवीण सिरसाठे, भाजयुमो तालुकाध्यक्ष ओम नाईकवाडी, हिम्मत भोसले, अमोलराजे निंबाळकर, विनोद निंबाळकर आदी उपस्थीत होते.

 
Top