उस्मानाबाद / प्रतिनिधी

उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अडचणीत असल्याने शेतकऱ्यांना पेरणीच्या वेळी पीक कर्ज मिळत नाही.राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपास बिलंब करत आहेत.उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रीयकृत व सहकारी अशा 17 बँकांनी 31 ऑगस्टपर्यंत सरासरी 51 टक्के पीककर्ज वाटप केले आहे त्यामुळे अशा बँकांवर कारवाई करावी अशी मागणी आमदार ठाकूर यांनी केली आहे. बँक ऑफ बडोदा 41 टक्के, बँक ऑफ इंडिया 58,बँक ऑफ महाराष्ट्र 46,कॅनरा बँक 31,सेंट्रल बँक ऑफ इंडिया 69,इंडियन बँक अलाहाबाद 46,पंजाब नॅशनल बँक 43,भारतीय स्टेट बँक 40, युनो बँक 37,युनियन बँक ऑफ इंडिया 67,अक्सिस बँक 41,एचडीएफसी बँक 28,आयसीआयसीआय बँक 33,आयडीबीआय बँक 57,रत्नाकर बँक 23,महाराष्ट्र ग्रामीण बँक 70 व डिसीसी बँकेने उद्दीष्टपेक्षा 57 टक्के पीक कर्ज वाटप केले आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील सततच्या पावसाने नुकसान झालेल्या पीकांचे तात्काळ पंचनामे ई-पीक पाहणी ऐवजी प्रत्यक्ष पाहणी करुन शेतक-यांना भरीव आर्थिक मदत मिळण्याची मागणी भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात गत काही दिवसापासुन मोठ्या प्रमाणात पाऊस होत असुन शेतामध्ये उभ्या असलेल्या पीकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये ब-याच गावात पाणी शिरल्याने घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उडीद, मुग, तुर, फळबागा, ऊस, सोयाबिन, टोमॅटो अशा शेती पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. शासनाच्या ई-पीक पाहणी करने हे तांत्रिक दृष्टया शक्य होत नसुन मोबाईल नेटवर्क व ईतर कारणाने हे जाचक होत आहे. तरी झालेली नुकसान पाहणी प्रत्यक्षरित्या करुन झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करुन शेतक-यांना सरसकट भरीव मदत देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

 
Top