उस्मानाबाद / प्रतिनिधी-

गवळी गल्लीतील श्री बाल हनुमान गणेश मंडळाचा धाराशिवचा महाराजा -मानाचा गणपतीची  प्राणप्रतिष्ठापन्ना दरवर्षाप्रमाणे 57 वर्षानुसार धार्मिक रितीरिवाजव शास्त्रशुध्द मंत्रोच्चाराने व ढोलताश्या, हलगी इ.वाद्याच्या गजरात व मोजक्या  लेझिमपटूच्या खेळाने मंगलमय , उत्साही व भक्तिभाव वातावरणात,गणपतीबाप्पा मोरया-कोरोनाला पळवून लावू या  या जयघोषात साध्यापध्दतीने व कोरोनाचे निर्बंध पाळून प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

श्री ची मूर्ती 39 वर्षापासून बनवून देणारे मानकरी सुरेश भांगे यांचा फेटा, शेला, श्रीफल देऊन दरवर्षाप्रमाणे सन्मान करण्यात आला.येथून श्री ची मूर्ती डोक्यावर दुर्गेश दिवटे, मनोज अंजीखाने,  विश्वास दळवी, संकेत तिर्थकर इ.मंदिरापर्यत आणण्याचा मान मिळविला.प्राणप्रतिष्ठापन्नेचा मान गेली 52 वर्षापासून विश्वेश्वर चं. चपने यांच्या शूभहस्ते करण्यात आले.प्राणप्रतिष्ठापन्ना पुरोहित सचिन स्वामी व काशिनाथ दिवटे यांच्या मुखातून निघालेला मंत्रोच्चराने करण्यात आली. श्री व सौ.संजय पाळणे दांपत्याने संकल्प पूर्ण झाला. 51 श्रीफल वाहिले.गणेशभक्ताने चांदीचे पाय व चांदीचे नारळ वाहिले.101 श्रीफल पेढे,बुंदिलाडू,पंचामृत श्री चे अंगवस्त्र पुष्पहार चरणी भक्तिभावाने अर्पण केले.

यावर्षी देशास स्वातंत्र्य मिळून 75 वर्षझाले या अमृतमहोत्सवा निमित दीपमहोत्सव,75वर्ष पूर्ण कलेल्या दांपत्यांचा सन्मान,मराठवाडा मुक्तिदिन हिप्परगा येथील राष्ट्रीय शाळेस 100 वर्षे झाल्याबद्दल बालगोपालाचा देशभक्तिपर गीत गायन व हिप्परगा राष्ट्रीय शाळेस युवक यवतीची मोटारसायकल रॅलीने अभ्यासपूर्ण भेट,सप्टेंबर महिना “ राष्ट्रीय पोषण आहार “

निमित अंगणवाडीतील बालकानां पोषक खाऊ खाद्य वाटप,स्त्रीभ्रूण हत्या रोखा,मुली असणार मातांचा  गौरव,सायकलीवरून भारतभ्रमणाचा,कोरोना योध्दांचा,राष्ट्रीय आदर्श शिक्षक,सामाजिक, शैक्षणिक क्रीडा,इ.क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या महिला -पुरूषांचा,गरजू व गरिबानां मदत करणार योगदाता,रक्तदाता,यांचा सन्मान करीत आहे. एक दिवस लसीकरण (कोविड)अशा विविध उपक्रमाने गणेशोत्सव साजरा करीत आहे.प्रा.गजानन गवळी,काशिनाथ दिवटे,संजय पाळणे,विद्या साखरे,विष्णूदास सारडा,विशाल देशमाने,अतुल ढोकर,सिध्देश्वर जावळे परिश्रम घेत आहेत.असे संयोजक भालचंद्र हुच्चे यानी सांगीतले.शोभेची दारू व फटाक्यांच्या आतषबाजीने संपन्न झाली.

 
Top