तुळजापूर / प्रतिनिधी-

 तिर्थक्षेञ तुळजापूर जवळ असणाऱ्या  पाचुंदा साठवण  तलावाचा भिंतीवर झाडे उगवुन त्यातुन   मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने हा तलाव फुटतो की, काय अशी भिती शेतकऱ्यांनमध्ये  निर्माण झाली आहे. शासनाने या तलावाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

या ठिकाणी निजाम काळात विहरी होत्या त्यातुन शहराला पाणीपुरवठा होत होता माञ  तिर्थक्षेञ तुळजापूरची लोकसंख्या वाढल्यामुळे १९७२ च्यादुष्कळ पुर्वी तिथेच महाराष्ट्र शासनाने तलाव तयार केला.तुळजापूर - लातूर रस्त्यावर शहरा लगत तीन ते चार कीलोमीटर अंतरावर असलेल्या पाचुंदा  तलावातुन शहराला पाणी पुरवठा होत होता. या तलावातील पाण्याने अनेक वर्ष कोट्यावधी भाविकांची तहान भागली होती.

सध्या स्थितीत  या दगडी  तलावाच्या भितीवर आलेले वृक्षाचे मोठ्या झाड्यांनमध्ये समावेश झाल्याने व याचा मुळ्या वाढत चालल्याने सध्या झाडांच्या  मुळ्यापासुन मोठ्या प्रमाणात पाण्याची धार वाहत असुन त्या  दिवसेंदिवस वाढत आहे ,त्यामुळे या तलावाखालील शेतकऱ्यांन मधुन तलाव फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे,

तरी सदरील तलावावरील झाडे काढुन तलावाची दुरुस्ती करावी व पाण्याचा होणारा अपव्यय टाळावा अशी मागणी होत

 
Top