उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शहरातील ताज चौक , गाजी पुरा , दर्गा रोड येथे कोरोना लसीकरण सत्र राबविण्यात आले कोरोना काळात शहरात मुख्य भूमिका बजविणारे डॉ. शकील अहमद खान सर यांच्या प्रयत्नामुळे शहरात विविध ठिकाणी शिबीर घेऊन लसीकरण मोहीम सुरू आहे.

 दर्गा रोड येथील ताज चौक येथे 11 सप्टेंबर 2021 रोजी लसीकरण शिबिर घेण्यात आले होते त्यामध्ये 189 लाभार्थी लसीकरण करून घेतले. शहरातील घनदाट वस्ती असलेल्या खाजा नगर समज पूरा दर्गा रोड या भागातील नागरिक लसीकरणासाठी पुढे येत नसल्याने डॉ.शकील खान अहमद यांनी या ठिकाणी लसीकरण शिबिर घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती करत लसीकरण मोहीम सुरू केली आहे.

  या भागांमध्ये लसीकरण मोहिमेसाठी ACM ग्रुप अध्यक्ष अजहर मुजावर यांच्या प्रयत्नातुन व युवा मशाल ग्रुप चे शेख जफर रब्बानी कार्यातून या मोहिमेला यश येताना दिसत आहे . या लसीकरण करण्यासाठी या ठिकाणीसादिक मुजावर,इम्रान मोकाशी,रिहान मुजावर,आरिफ मुजावर,आदीब सय्यद,तन्वीर मुजावर,अब्दुल काझी, खय्याम मुजावर,अय्युब शेख,अरशाद शेख,फवाद रजवी सर या सर्वांनी या ठिकाणी मदत केली.

  यावेळी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील बाळासाहेब काकडे , अनिल मगर,शरद शिंदे, सुहास चव्हाण, रत्नाकर पाटील  ,ANM थोरात , PHN गायकवाड उपस्थित होते

 
Top