उमरगा  / प्रतिनिधी-

 पदाचा गैरवापर करून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार, नियम डावलणे, मनमानी कारभार अशा एक ना अनेक मुद्यांवर जबाबदार धरूननगराध्यक्षा प्रेमलता परमेश्वर टोपगे यांना नगरविकास खात्याने अपात्र ठरवून  पुढील सहा वर्षे नगर परिषद निवडणूक लढविण्यास प्रतिबंधित केले आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. 

पालिकेच्या भ्रष्टाचार प्रकरणात, मनमानी कारभाराबाबत उमरगा नगराध्यक्षांना निलंबित का करू नये अशी नोटीस राज्य सरकारच्या नगरविकास खात्याने दोन महिन्यापूर्वी बजावली होती. त्यासंदर्भात अंतिम सुनावणी नगरविकास खात्याने, नगराध्यक्षासह तक्रारदार नगरसेवकांना आपले अंतिम म्हणणे मांडण्यासाठी नोटीस बजावली होती, त्यावर १७ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाइन म्हणणे सादर करण्यात आले होते. नगर विकास खात्याने गुरुवारी (०९) यासंदर्भात आदेश काढला असून त्यामध्ये नगराध्यक्षाना अपात्र व सहा वर्षे निवडणूक लढविण्यास प्रतिबंधीत करण्यात आले आहे. तसेच मुख्याधिकारी, अधिकारी कर्मचारी व पदाधिकारी यांच्याविरूध्द विभागीय चौकशी प्रस्तावित केले असून आवश्यक प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी शासनास सादर करावा असे आदेश नगरविकास मंत्रालयने काढले आहेत. 


 
Top