उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तुळजापूर येथील प्राचीन मंकावती तिर्थकुंड हडप केल्याप्रकरणी आरोपी देवानंद रोचकरी व त्यांचे बंधू बाळासाहेब रोचकरी यांचा जामीन अर्ज उस्मानाबाद जिल्हा कोर्टाने फेटाळला आहे. न्यायाधीश एन एच मखरे यांनी याबाबत आदेश करीत असताना जामीन फेटाळला. 

प्राचीन मंकावती तिर्थकुंडाची देवानंद रोचकरी यांनी चुकीच्या पद्धतीने घेतलेली नोंद , जिल्हाधिकारी यांनी नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल, रोचकरी यांच्यावर दाखल असलेल्या 24 गुन्ह्यांचा इतिहास व गुन्हेगारी पार्श्वभूमी, शासकीय व खासगी जमीन बळकावणे,तत्कालीन मुख्याधिकारी डॉ पंकज जावळे मारहाण प्रकरणात झालेली शिक्षा यासह अन्य बाबींवर न्यायालयाने मत नोंदवित जामीन 9 सप्टेंबर 2021 रोजी फेटाळला आहे. याप्रकरणी सरकारच्या वतीने जिल्हा सरकारी वकील ऍड शरद जाधवर यांनी तर आरोपींच्या वतीने ऍड विजयकुमार शिंदे यांनी न्यायालयात बाजु मांडली. जामीन फेटाळल्याने रोचकरी बंधुचा उस्मानाबाद जिल्हा कारागृहातील मुक्काम तूर्तास तरी वाढला असुन हे प्रकरण आता औरंगाबाद उच्च न्यायालयात जाणार आहे.


 
Top