उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भारतीय जनता पार्टी उस्मानाबादच्या वतीने राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक अभियान अंतर्गत प्रतिष्ठान भवन भाजप कार्यालय धाराशिव येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. डॉ उज्वला दहिफळे, व भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये ही बैठक संपन्न झाली. डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी, व पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करून बैठकीला सुरुवात करण्यात आली.

देशातील जनतेच्या आरोग्यासाठी शासकीय यंत्रणा उभी आहेच मात्र यांच्या मदतीला समाजातील विविध घटकांनी पुढे यायला हवे, आरोग्य यंत्रणेच्या बरोबरच सामाजिक कार्यकर्ते युवकांनी आरोग्यसेवेत आपले योगदान देण्याची गरज आहे अशा युवकांना राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक अभियान हे चांगले व्यासपीठ असल्याची माहिती, राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक अभियानाच्या प्रदेश संयोजिका उज्वलाताई दहिफळे-कराड यांनी दिली, त्या भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालयात अभियानाची माहिती देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.

 राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक अभियानात आपल्याला बुथ स्तरापर्यंत आरोग्यविषयक जनजागृती करणारी, प्रत्यक्ष आरोग्य संकटात नागरिकांना मदत करणारी यंत्रणा विकसित करायचे उद्दिष्ट गाठायचे आहे, यामध्ये 4 स्वयंसेवकांची टिम तयार करायची असल्याचे त्यांनी नमूद केले, कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत जिथे जिथे अशी यंत्रणा तयार करण्यात यश आले त्याठिकाणी आरोग्यविषयक मोठी जनजागृती व सेवाकार्य करण्यात आले अशी माहिती त्यांनी दिली. हे अभियान स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विचारांचा प्रकल्प आहे,सरकारी यंत्रणा व त्याबरोबरच जनतेमध्ये जागरूकता निर्माण व्हावी ही त्यांची तळमळ या अभियानाच्या माध्यमातून दिसून येते असेही त्या म्हणाल्या.

 याप्रसंगी दत्ताभाऊ कुलकर्णी, ऍड खंडेराव चौरे, नेताजी पाटील, सुनील काकडे, इंद्रजीत देवकते,ॲड.नितीन भोसले, प्रदीप शिंदे, रामदास कोळगे, डॉ प्रशांत पवार, पिराजी मंजुळे, राजसिंह राजेनिंबाळकर, प्रवीण सिरसाठे, राजाभाऊ पाटील, डॉ.आनंद  मोरे, अभय इंगळे, दाजीप्पा पवार, प्रवीण पाठक, दत्तात्रय देशमुख, पांडुरंग लाटे, लक्ष्मण माने, बालाजी कोरे, विनायक कुलकर्णी, आशिष नायकल, पांडु  पवार, मनोज रनखांब, नामदेव नायकल, प्रशांत रणदिवे, कुलदीप भोसले, वैभव हांचाटे, प्रमोद बचाटे, विनोद निंबाळकर, अमोलराजे निंबाळकर, प्रीतम मुंडे, आशाताई लांडगे, अर्चनाताई अंबुरे, देवकण्या गाडे, गणेश एडके, हिम्मत भोसले, अजय यादव, अमित कदम, सुरज शेरकर, प्रसाद मुंडे, पोपट राठोड, गिरीष पानसरे, बबलू शेख, सुनील पांगुडवले, सागर दंडणाईक, तेजस सुरवसे, तसेच शहर व ग्रामीण भागातील भाजपचे असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थीत होते.

 
Top