उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथील शिवाजी नगर,सांजा बायपास,येथून दि.24 मे 2021 रोजी रात्री 11.30 ते दि.25 मे 2021 रोजी रात्री 1.00 च्या दरम्यान मुलगी कु.साक्षी पांडुरंग लोंढे आणि शेजारची मुलगी कु.सुलेखा रामबरन केवड या त्यांच्या राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेल्या आहेत.त्यांना कोणी तरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी पळवून नेले असावे असा संशय आहे.

  त्याचे वर्णन पुढीलप्रमाणे:-1)मुलीचे नाव-साक्षी पांडुरंग लोंढे,वय-17 वर्ष 4 महिने,शिक्षण-बारावी,रा.शिवाजी नगर,सांजा रोड,उस्मानाबाद जन्म दि.24 जानेवारी 2004,उंची-पाच फुट,रंग-गोरा,बांधा-सडपातळ,नाक-सरळ,अंगावर-काळया रंगाचा लेगिज पॅन्ट टॉप पिवळया रंगाचा.

  2)मुलीचे नाव-सुलेखा रामबरण केवट ,वय-17 वर्षे 8 महिने,शिक्षण-बारावी,शिवाजी नगर सांजा रोड,उस्मानाबाद.जन्म दि.15 ऑगस्ट 2003,उंची-पाच फुट,रंग-सावळा,बांधा-सडपातळ,नाक-सरळ,अंगावर निळया रंगाचा टॉप आणि काळया रंगाची लेगीज पॅन्ट अशा वर्णनाच्या मुली हरवल्या असल्याची तक्रार पोलीस स्टेशन आनंद नगर,उस्मानाबाद यांच्याकडे आली आहे.

  या  मुलींची माहिती मिळाल्यास श्री. दाराडे मो. 8390090099, श्री. गोरे मो.8888837594 आणि पोलीस स्टेशन आनंद नगर, उस्मानाबाद येथे संपर्क साधावा,असे आवाहन पोलीस ठाण्यातर्फे करण्यात आले आहे.

 
Top