उस्मानाबाद / प्रतिनिधी-

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद या संस्थेच्या ५९ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून गुरुवर्य के. टी.पाटील (बप्पा) यांच्या ९३ व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा दिनांक ११ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ०९.०० वाजता श्रीपतराव भोसले हायस्कूल येथे पार पडणार आहे.

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद ह्या संस्थेची गुणवत्तापूर्ण व वैविध्यपूर्ण शिक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर दखल घेतली जाते. 

ज्यांनी या संस्थेचा रोपट्यापासून वटवृक्ष केला अशा गुरुवर्य के.टी.पाटील सरांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये गुरुवर्य के.टी. पाटील सरांचा अभिष्टचिंतन सोहळा, मागील वर्षभरात विशेष कौतुकास पात्र ठरलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार,  आदर्श शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार व सन्मान, सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार तसेच सद्यस्थिती पाहता 93 गरजू गरीब कुटुंबीयांना अन्नधान्य किट वाटप आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती संस्थेचे प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील यांनी दिली.

 या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश बोधले महाराज, माजी मंत्री व विद्यमान आमदार राणाजगजीतसिंह पाटील तर शिक्षणाधिकारी गजानन सुसर, डायटचे प्राचार्य डॉ.बळीराम चौरे, शिक्षणाधिकारी डाॅ.अरविंद मोहरे, गटशिक्षणाधिकारी सौ.रोहिणी कुंभार, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील, तुळजाभवानी बँकेचे चेअरमन संजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 

तरी सर्वांनी या अभिष्टचिंतन सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन आदर्श शिक्षण परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

 
Top