तुळजापूर  / प्रतिनिधी-

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधुन  मंकावती गल्लीत नगरसेवक सुनील रोचकरी यांच्या पुढाकाराने  उपजिल्हा रुग्णालय  अंतर्गत  प्रभाग क्रमांक 4  मध्ये शुक्रवार दि.१७रोजी आयोजित कोविशिल्ड  लसीकरणास नागरिकांचा उत्स्फूर्त मोठा प्रतिसाद लाभला.या लसीकरणासाठी नगरसेवक सुनील पिंटू रोचकरी यांनी प्रभागातील नागरिकांना घरोघरी जाऊन लस घेण्याचे आवाहन केले व त्यांना लसीकरणाचे  महत्व समजावून सांगितले.

 या लसीकरण ठिकाणी  खासदार ओमराजे निंबाळकर, जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास दादा पाटील यांनी भेट दिली.तसेच उपजिल्हा रुग्णालयातील  कर्मचारी यांना मान्यवरांच्या हस्ते  भेट वस्तू  देण्यात आल्या.लसीकरण झालेल्या नागरिकांना अल्पाहार देण्यात आला.

 यावेळी सुधीर कदम,अनंत कोंडो, श्याम पवार, शामल वडणे,राजू काका प्रयाग,प्रतीक रोचकरी,करण साळुंके,शिवाजी अमृतराव,सुदर्शन वाघमारे,सचिन सुरवसे,सोमनाथ अमृतराव,अक्षय सुरवसे सह आदि उपस्थित होते.  सर्व  नागरिकांचे आभार नगरसेवाक सुनील पिंटू रोचकरी यांनी मानले. 

 
Top