उस्मानाबाद / प्रतिनिधी

 जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.  प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे झाला होता. त्यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृह मध्ये अध्यक्ष अस्मिता कांबळे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार नवाळे, महिला व बाल विकास च्या सभापती श्रीमती रत्नमाला टेकाळे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी.एम.राऊत, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, पाणी व स्वच्छता मिशन चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, महिला व बाल विकास विभागाचे कार्यक्रम अधिकारी बी.एच. निपाणीकर,बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नितिन भोसले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.यतीन पुजारी,कृषी विकास अधिकारी महेश कुमार तीर्थकर,माध्यमिक शिक्षणाधिकारी गजानन सुसर,जिल्हा परिषदेच्या सदस्य श्रीमती उषा येरकळ,गटशिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार,जिल्हा माता व बाल आरोग्य अधिकारी डॉ.मिटकर यांच्या सह जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. 

 
Top