उस्मानाबाद / प्रतिनिधी

उस्मानाबाद जिल्हा परिषदेत मराठवाडा मुक्त दिनाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

 मराठवाडा मुक्तिसंग्राम सोहळ्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे करून जिल्हा परिषदेच्याअध्यक्षा अस्मिता कांबळे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता आणि उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले. तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत तिरंगा ध्वज फडकवण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत, महिला बालकल्याण सभापती श्रीमती रत्नमाला टेकाळे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी.एम. राऊत, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, पाणी पुरवठा व स्वच्छता मिशन चे अनंत कुंभार, महिला बालविकास चे कार्यक्रम अधिकारी बी. एच.निपाणीकर, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नितिन भोसले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ यतीन पुजारी,कृषी विकास अधिकारी डॉ महेश कुमार तीर्थकर,माध्यमिक शिक्षणाधिकारी गजानन सुसर,जिल्हा परिषदेच्या सदस्या उषा येरकळ, गटशिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार जिल्हा माता व बाल आरोग्य अधिकारी डॉ. मेटकर यांच्यासह सर्व विभागातील प्रमुख अधिकारी कर्मचारी हजर होते. 

 ध्वजारोहणानंतर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृह मध्ये शासकीय वाहन चालकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

 
Top