मुरूम / प्रतिनिधी 

येथील यशवंत नगरातील यशवंतराजा बाल गणेश मंडळाच्या वतीने आयोजित आरोग्य, पोलिस, नगर परिषद व अंगणवाडी सेविका आदी क्षेत्रातील कोरोना योध्दांचा सत्कार शुक्रवारी (ता. १७) रोजी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे व  प्रमुख पाहुणे नगर परिषदेचे मुख्याधिकारी यु. जे. देशपांडे, महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे, डॉ. सुभाष हुलपल्ले, पर्यवेक्षिका जे. एल. दूधभाते, पत्रकार महेश निंबरगे, प्रा. सुजित मटकरी, मोहन राठोड, कमलाकर जाधव, बी. डी. पवार, अर्जुन वायचोळे, विलास राठोड, श्रीमंत लामजने आदींच्या उपस्थितीत प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. 

यावेळी पोलिस ठाण्याचे पोकॉ. श्रीराम सोनटक्के, महेश गायकवाड, ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी डॉ. सरवदे, भालेराव, कांबळे, अंगणवाडीसेविका मनीषा माने, माधुरी समुद्रे, स्नेहल गोडबोले, भाग्यश्री घोडके, वंदना बन्ने, भाग्यश्री पन्हाळे, रेश्मा कांबळे, कमल शेवाळे, तनवीर उडचणे तर नगर परिषदेचे सफाई कामगार गौतम गायकवाड, पवन कांबळे, अमोल रासुरे आदींचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ. महेश मोटे यांनी गणेश मंडळाने आयोजित उपक्रमाबाबत सामाजिक बांधिलकीची भावना जोपासल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले. डॉ. सुभाष हुलपल्ले, महेश निबंरगे, विजयकुमार देशमाने यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपप्रसंगी डॉ. अशोक सपाटे म्हणाले की, अशा गणेश मंडळाच्या माध्यमातून असे उपक्रम समाजाला दिशा व प्रेरणा देणारे आहेत. सहशिक्षक संजयकुमार राठोड व बाबुराव राठोड यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले. 

या मंडळाचे अध्यक्ष सचिन कोळी, उपाध्यक्ष उदय राजपूत, सचिव लक्ष्मण मंडले, पदाधिकारी सतीश उगळवार, कृष्णा वासुदेव, करन कोळी आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक भोसले तर आभार विजयकुमार देशमाने यांनी मानले.                     

 
Top