उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 ऑफ महाराष्ट्र मधील शाखा अधिकारी नितीन भेंडे  यांनी यावर्षांत आकारा कोटी तेवीस लाख पिकं कर्ज वाटप करून जिल्हयातील कर्ज वाटपासाठी तिसरा क्रमांक ही बँक पोहचवली आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गावागावांत बँका पिकं कर्ज वाटपासाठी टाळाटाळ करतांना दिसतं परन्तु तडवळे येथील बँक ऑफ महाराष्ट्र याला अपवाद ठरली आहे गेल्या  चार  महिन्यात सुमारे नऊशे तीस शेतकऱ्यांना आकारा कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे कोरोनाच्या काळात येथुन बदली झालेले शाखा अधिकारी क्षीरसागर व सध्या शाखा अधिकारी असलेले नितीन भेंडे  यांनी दैनंदिन कामास अडचण येऊ नये म्हणून सोशल  डिस्टन्स ठेऊन पैसे भरणे ,काढणे साठी रांगेची व्यवस्था केली ,या बँकेच्या कार्यक्षेत्रात तडवळे सह सात गांवे असल्याने नेहमी गर्दी होते सध्या पीककर्ज साठी कागदपत्रे घेणे जामीनदार यांच्या सह्या घेण्यासाठी शाखा अधीकारी श्री भेंडे यांनी एक कर्मचारी नेमल्याने गर्दी न होता कागदपत्रे व्यवस्थित तपासून फॉर्म भरून संबंधित शेतकऱ्यांना विना तक्रार कर्ज मिळतं असल्याने शेतकरी वर्गात समाधानकारक वातावरण तयार झाले आहे या पीक कर्जाच्या वाटपात बँकेत जास्त गर्दी होऊ नये म्हणून बँकेच्या बाजूला स्वतंत्र व्यवस्था केल्याने बँकेच्या इतर व्यवहारावर परिणाम होणार नाही याची शाखा अधिकारी नितीन शेंडे यांनी काळजी घेतली आहे .

या सर्व कामात बँकेच्या शाखा अधिकारी श्री भेंडे सह शाखा प्रबंधक आर पी गायकवाड,उज्वला शितोळे , भुजंग वाघमारे,  रमेश बनसोडे ,सह आदी परिश्रम घेत आहेत व गणेश उत्सव निमित्त बँकेने महासुपर वाहन कर्ज ,हाऊसिंग लोन  ,विना प्रोसेसिंग फिस न घेता ७.१५टक्क्यांनी वाटप होईल,असे ही सांगण्यात आले. 

 
Top