लोहारा / प्रतिनिधी

 २०२०-२१ मध्ये अाैरंगाबाद विभागात राबवण्यात अालेल्या महाअावास अभियानांतर्गत लाेहारा पंचायत समिती व धानुरी ग्रामपंचायतीने द्वितीय क्रमांक पटकावला हाेता. याबद्दल धानुरी ग्रामपंचायतीला महाआवास अभियान पुरस्कार जाहीर झाला हाेता. शुक्रवारी (दि.३) विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या हस्ते धानुरी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी धानुरीच्या सरपंचासह अधिकारी उपस्थित होते.

राज्य पुरस्कृत विविध आवास योजनेमध्ये (ग्रामीण) उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था, व्यक्तींची विभागीय स्तरावरील महाआवास अभियान पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजनेमध्ये जास्तीत जास्त घरकुल मंजूर करून घरकुल पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल या पुरस्कारासाठी धानुरी ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे. लोहारा तालुक्यातील धानुरी ग्रामपंचायतीने मराठवाडा विभागात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. शुक्रवारी (दि.३) विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या हस्ते धानुरी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, लोहारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान अकेले, धानुरीचे सरपंच प्रविण थोरात, उपसरपंच विठ्ठल बुरटुकणे, माजी सरपंच गणेश जाधव, माजी उपसरपंच संभाजी वडजे, ग्रामपंचायत सदस्य राम पाटील, ग्रामविकास अधिकारी प्रदीप जाधव, परमेश्वर साळुंके, संदीपान बनकर, राहुल जाधव, नारायण साळुंके, ग्रामपंचायत लिपिक नेताजी लुटे आदी उपस्थित होते. प्रत्येक ग्रामपंचायतीने प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजनेसह इतर विविध योजना राबवून सामान्यांना लाभ मिळवून द्यावा. यामुळे ग्रामीण भागातील विकास होण्यास मदत होणार आहे. यासाठी अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनी ही पुढाकार घेण्याची गरज आहे.

 
Top