परंडा / प्रतिनिधी 

 परंडा तालुक्यातील अनाळा येथे भारतीय स्टेट बँक ग्रामिण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था , स्वयंम शिक्षण प्रयोग संस्था उस्मानाबाद व उमेद यांनी आयोजित केलेल्या दहा दिवशीय शेळीपालन प्रशिक्षणाचा समारोप दि . २७ रोजी करण्यात आला .

 दि . १८ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर दरम्यान हे प्रशिक्षण अनाळा येथील शासकिय गोदामात संपन्न झाले . या प्रशिक्षणात ३० महिला सहभागी झाल्या होत्या . प्रशिक्षणात महिलाना शेळीपालन, गांडुळ बेड उभारणी , लघुउद्योग, पशुधन , बँकेच्या विविध योजना विषयी माहिती ग्रामिण स्वरोजगार संस्था जिल्हा समन्वयक विकास गोफणे यांनी महिलांना दिली . या प्रशिक्षणार्थी महिलांना संस्थेमार्फत मोफत गणवेश , वहि , पेन व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती . आज दि. २७ प्रशिक्षणाच्याअंतीम दिवशी महिलांना शेळीपालन प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र महाराष्ट्र ग्रामिण बँकेचे शाखा व्यवस्थापक व्हि. पी . सावंत व जिल्हा समन्वयक विकास गोफणे यांच्या हस्ते महिलांना वितरीत करण्यात आले . शासनाच्या विविध योजने चा महिलानी लाभ घ्यावा व आपला विकास साधवा असे आवाहन जिल्हा समन्वयक  विकास गोफणे यांनी केले . या प्रशिक्षणासाठी स्वयंम शिक्षण प्रयोग संस्था उस्मानाबाद जिल्हा समन्वयक किरण माने , भूम - परंडा - वाशी समन्वयक सीमा सय्यद यांचे सहकार्य लाभले . कार्यक्रमास सरपंच  अंबिका क्षिरसागर , उमेदचे सल्लागार गणेश नेटके , कांबळे यांच्या सह प्रशिक्षणार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या . कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार  गणेश नेटके यांनी केले .दहा दिवशीय प्रशिक्षण यशस्वीतेसाठी परंडा तालुका समन्वयक नौशाद शेख यांनी अथक परिश्रम घेतले .


 
Top