परंडा / प्रतिनिधी :-

परंडा तालुक्यातील पांढरेवाडी येथील निम्न खैरी प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरला असल्याने धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.धरण परिसरात व वरील नदी परिसरात मोठ्या प्रमाणात पर्जण्य वृषठी झाल्याने प्रकल्पाच्या सांडव्यातून पाणी ओसंडून वाहू लागले आहेत.

प्रकल्पाच्या खालील बाजूस म्हणजे दक्षिणेस  शेळगाव हे गाव असून येथून तालूक्यास व करमाळा मार्गे पुण्यास जाण्यासाठीचा  मार्ग येथून आहे.परिसरतील लोकांना पुणे , मुंबई आदी ठिकाणी जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करावा लागतो.परंतू निम्न खैरी प्रकल्प पावसाळ्यात भरल्यानंतर शेळगाव नजीक खैरी नदीवर असणाऱ्या पुलाची उंची कमी असल्याने प्रत्येक वर्षी नदीला पुर आला की, पाणी पुलावरून वाहते व त्यामुळे या मार्गे  होणाऱी वहातूक बंद करावी लागते.परिणामी वाटेफळ,आनाळा,इंंनगोदा,चिंचपूर,उंडेगाव शेळगाव,पांढरेवाडी सह परिसरातील अनेक गावच्या लोकांना अडचणी निर्माण होत आहेत.सदरील पुलावरून पाणी वाहत असल्याने या मार्गे प्रवासी वाहतूक करणाऱ्या एस टी बसला मुगाव,डोंज, देऊळगाव, तांदूळवाडी,असा लांब पल्ल्याच्या मार्गाचा वापर करावा लागत आहे.सरदचा पुल हा धरणा पासून काही अंतरावर असल्याने ह्या पुलाची उंची धरणचे काम होताच वाढवणे  गरजेचे होते परंतु तसे न झाल्याने व शासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांना त्रास सहण करावा लागत आहे.सरदील पुलाची उंची वाढवून प्रत्येक वर्षी रस्ता बंदच्या समस्येतून ग्रामस्थांची सुटका करावी असी मागणी ग्रामस्थांतून होऊ लागली आहे.  सदरील वहातूक दोन दिवसा पासून बंद आहे.


 
Top