४१ प्रकल्पात २५ टक्क्यापेक्षा कमी जलसाठा 


उस्मानाबाद
/ प्रतिनिधी-

जिल्हयात शुक्रवार दि. २४ सप्टेंबर २०२१ पर्यंत एकुण सरासरी ९८१.८६ मीमी पाऊस झाला आहे. हा पाऊस वार्षीक सरासरी पावसाच्या ११७. ८७ टक्के झाला आहे. पावसाने सरासरी ओलाडल्यामुळे खरीपातील सोयाबीन तुर, मका, ज्वारीसह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. भाजीपाला व फळबांगाना ही याचा मोठा फटका बसला आहे. सरसरी पेक्षा जास्त पाऊस पडला असला तरी मध्यम व लघु प्रकल्पापैंकी ४१ प्रकल्पात २५ टक्क्यापेक्षा कमी जलसाठा आहे. 

उस्मानाबाद जिल्हयात २४ सप्टेंबर २०२१ पर्यंत तालुकानिहाय पडलेला पाऊस या प्रमाणे

उस्मानाबाद ६३२.५० मीमी, तुळजापूर ७३८.२० मीमी, परंडा ६७८.५० मीमी,भूम ८६०.८० मीमी, कळंब ६३४.५० मीमी, उमरगा ७७५.९० मीमी, लोहारा ६१६.२० मीमी, वाशी ८१०.६० मीमी इतरका पाऊस झाला आहे. जिल्हयाची पावसाची वार्षीक सरासरी ६०३.१० मीमी इतकी आहे.त्यामुळे जिल्हयात ११७. ८७ टक्के पाऊस झाला आहे. 

पिकांची नासाडी

जिल्हयात सरासरीच्या पेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे अनेक बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतात पाण्याची तळे निर्माण झाले आहेत.  त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकरण ज्या पिकावर अंवलबून असते ते सोयाबीन पिकाची मोठया प्रमाणात नासाठी झाली आहे. खरीप हंगामात सोयाबीन बरोबरच तुर, मका, खरीप ज्वारी यांच्यासह केळी, पपई, चिंकु आदींच्या बागेला ही फटका बसला आहे.अनेक शेतकऱ्यांनी दैनंदिन खर्च भागविण्यासाठी पालेभाज्यावर भर दिला आहे. याच पावसाचा फटका लिंबू, टमाटे, वागे,कोबु आदींसह अन्य पालेभाज्यांना फसला आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानाची त्वरीत पंचनामा करावा,अशी मागणी शेतकऱ्यांमधुन होत आहे. 

मध्यम व लघु ४१ प्रकल्पात २५ टक्के जलसाठा 

उस्मानाबाद जिल्हयात एकुन २२६ सिंचन प्रकल्प आहेत. त्यापैकी मोठा एक प्रकल्प असून मध्यम १७ व लघु २०८ प्रकल्प आहेत. यापैंकी मोठा प्रकल्प असलेल्या सिना-कोळेगांव या प्रकल्पात ५० टक्के जलसाठा आहे.तर १ मध्यम व ४० लघुप्रकल्पात २५ टक्के जलसाठा आहे. तर इतर एक मध्यम व १४ लघु प्रकल्प १०० टक्के भरले आहेत.कांही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे ८ मध्यम व ७१ लघु प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. 

 
Top