परंडा / प्रतिनिधी :- 

हैदराबाद मुक्तिसंग्राम यशस्वी करून मराठवाड्यातील जनतेने निजामाच्या अन्याय राजवटीविरुद्ध लढा यशस्वी केला असे प्रतिपादन शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयात मध्ये आयोजित केलेल्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मार्गदर्शन करताना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.दिपा सावळे यांनी केले. 

 शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय आणि संत गाडगेबाबा महाविद्यालय परंडा यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. दिपा सावळे या उपस्थित होत्या. यावेळी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्या डॉ.दीपा सावळे यांच्या हस्ते पूजन व ध्वजारोहण करण्यात आले. 

 पुढे बोलताना प्राचार्या डॉ.सावळे म्हणाल्या की मराठवाडा निजामाच्या राजवटीततून मुक्त करण्यासाठी अनेक राजकीय आंदोलने, विद्यार्थी चळवळी आणि सशस्त्र आंदोलने झाली.निजामाच्या अन्याय राजवटीतून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी मोठी चळवळ उभी करण्यात आली . आणि त्या चळवळीचे त्याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी केले .अशातच १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त झाला . कार्यक्रमाचे आयोजन प्रा डॉ शहाजी चंदनशिवे आणि शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ कृष्णा परभने यांनी केले होते. यावेळी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. 

हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्वामी रामानंद तीर्थ यांची भूमिका, हैदराबाद मुक्ती संग्रामातील राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे कार्य आणि हैदराबाद मुक्तिसंग्रामातील उस्मानाबाद जिल्ह्याची भूमिका  हे तीन विषय निबंध स्पर्धेसाठी देण्यात आले होते. अनेक विद्यार्थी या निबंध स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते .या कार्यक्रमासाठी कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी कोव्हीड-१९ चे पालन करत मास्क घालून उपस्थित होते.यावेळी डॉ.शहाजी चंदनशिवे यांना आंतरराष्ट्रीय शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर झाल्यामुळे प्राचार्या डॉ.सावळे यांच्या हस्ते पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .शेवटी कार्यक्रमाचे आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

 
Top