उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय प्रतिष्ठाण भवन धाराशिव येथे भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे व इतर मान्यवरांच्या हस्ते मराठवाडा मुक्तीसंग्राम दिना निमीत्त राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वामी रामानंद तिर्थ यांचे प्रतिमा पुजन करुन ध्वजारोहन कार्यक्रम करण्यात आला.

 मराठवाडा हा प्रथम पासूनच कर्तुत्ववान लोकांचा प्रांत म्हणून ओळखला जातो.‌ साहित्य, क्रीडा, संगीत, कला, अर्थकारण, राजकारण, समाजकारण प्रत्येक क्षेत्रात मराठवाड्यातील लोकांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे.

 मराठवाड्याची उत्तरोत्तर अधिकाधिक प्रगती होत राहो हीच सदिच्छा व मराठवाड्याच्या मुक्तीसाठी अविरत संघर्ष करणाऱ्या, बलिदान देणाऱ्या क्रांतिवीरांना शतशः नमन !

 या प्रसंगी बुध्दिजिवी प्रकोष्ट प्रभारी दत्ता कुलकर्णी, प्र.का.स.ॲड.खंडेराव चौरे, जिल्हा समन्वयक नेताजी पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुनिल काकडे, जिल्हा सरचिटणीस ॲड.नितीन भोसले, जिल्हा सरचिटणीस प्रदिप शिंदे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.प्रशांत पवार, डॉ.मनोज घोगरे, कृ.उ.बा.समिती सभापती दत्तात्रय देशमुख, प.स.सदस्य बालाजी गावडे, प.स.सदस्य आशिष नायकल, प.स.सदस्य सुधीर करंजकर, तालुका अध्यक्ष राजाभाऊ पाटील, शहराध्यक्ष राहुल काकडे, ता.सरचिटणीस नामदेव नायकल, भाजप नेते भारत डोलारे, जिल्हा सचिव जोत्सना लोमटे, भाजपा युवती मोर्चा पुजा देडे, उपनगराध्यक्ष अभय इंगळे, सह प्रसिध्दी प्रमुख विनायक कुलकर्णी, पांडुरंग लाटे, प्रल्हाद धत्तुरे, दाजीप्पा पवार, युवराज नळे, शिवाजी पंगुडवाले, दत्ता पेठे, नाना घाटगे, भाजयुमो ता.अध्यक्ष ओम नाईकवाडी, नरेंद्र वाघमारे, विनोद निंबाळकर, अजय यादव, गणेश इंगळगी, ॲड.गांधी, सुनिल पंगुडवाले, सागर दंडनाईक, ऋशिकेष चव्हाण, व मान्यवर पदाधिकारी उपस्थीत होते.

 
Top