उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भारतीय जनसंघाचे संस्थापक तथा राष्ट्रीय सरचिटणीस पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या आज जयंती असुन यांच्या जयंती निमीत्त देशभरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांच्या प्रतिमेचे पुजन करुन व विविध सामाजीक उपक्रम राबवुन जयंती साजरी करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आज भारतीय जनता पार्टी उस्मानाबादच्या वतीने प्रतिष्ठाण भवन भाजपा कार्यालय उस्मानाबाद येथे पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पुजन भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नितीन काळे यांनी पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या विषयी माहिती देतांना सांगीतले की जनसंघासाठी त्यांनी खुप मोलाचे योगदान दिले असुन समाजाचा अंतीम घटक असलेल्या व्यक्तीचा विकास ही अंत्योदयाची संकल्पना स्पष्ट केली. अशा महान विचार सरनी असणाऱ्या महापुरुषास जयंती निमीत्त विनम्र अभिवादन केले. तसेच या प्रसंगी पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या जिवन चरित्रा बद्दल बुध्दीजिवी प्रकोष्ठचे पांडुरंग पवार यांनी माहिती दिली.

या प्रसंगी प्र.का.स. ॲड.खंडेराव चौरे, ओबीसी प्रदेश सचिव पिराजी मंजुळे, जिल्हा उपाध्यक्ष सुनिल काकडे, इंद्रजीत देवकते, भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, विनोद गपाट, शहराध्यक्ष राहुल काकडे, लक्ष्मण माने, पांडुरंग लाटे, महेश चांदणे, ता.सरचिटणीस नामदेव नायकल, महिला मोर्चाच्या अर्चना अंबुरे, भाजयुमो जि.चिटणीस गणेश येडके, भाजयुमो ता.अध्यक्ष ओम नाईकवाडी, उप नगराध्यक्ष अभय इंगळे, नगर सेवक प्रविण पाठक, दाजीप्पा पवार, दुर्गाप्पा पवार, सुजित साळुंके तसेच दयानंद भोईटे, अमोल राजे निंबाळकर, हिम्मत भासले, ‍विनोद निंबाळकर, अजय यादव, प्रितम मुंडे, सुरज शेरकर, प्रसाद मुंडे, शाम तेरकर, स्वप्नील नाईकवाडी, गीरीष पानसरे, मनोज ठाकुर, प्रेम पवार  तसेच उस्मानाबाद शहर व ग्रामीण भागातील भाजपाचे असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थीत होते.

 
Top