उस्मानाबाद / प्रतिनिधी-

डॉ.पदमसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई व जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व उपचार शिबाराचे आयोजन सोमवार दि.२७ सप्टेंबर २०२१ रोजी, मौजे पाडोळी (आ.) ता.उस्मानाबाद येथे सकाळी १०:०० ते ५:०० या वेळेत करण्यात आले होते. या आरोग्य शिबीराचा मंगरुळ व परिसरातील सर्व वयोगटातील ६५० महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.

 या शिबीराचे उद्दघाटन जि.प.अध्यक्षा अस्मिता  कांबळे यांच्या हस्ते झाला. या वेळी मा.जि.प.अध्यक्ष गुंड गुरुजी, उप सरपंच बाबुराव पुजारी, ग्रामसेवक एन.के. भोईटे, ग्रा.प.सदस्य सतिष तकेडे, महादेव ठाकरे, हनमंत चव्हाण, अभिमन्यु कासार, मैनाबाई कासार, भरत गुंड, बालाजी खराडे, चक्रधारी गुंड, आण्णासाहेब कांबळे, व्यंकट पाटील, शरद खराडे, नाना कांबळे, वामन गाते, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.अजय माने, डॉ.गौरव नळेगावकर, ग्रामस्थ उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ.सौरभ विश्वकर्मा, डॉ.रोहीत कोळी, डॉ.आनंद यादव, डॉ.स्वप्नील नायक, डॉ.परवीन सय्यद, डॉ.तेजस यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. यावेळी तेरणा जनसेवा केंद्राचे सुजित पाटील, विनोद ओव्हाळ, रवि शिंदे, पवन वाघमारे, सचिन चव्हाण, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आशा कार्यकर्ता यांनी परिश्रम घेतले.


 
Top