उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 सभासदांसाठी सर्व आर्थिक व्यवहार संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत आहेत़ सभासदांच्या हितासाठी उस्मानाबाद तालुका शिक्षक सहकारी पतसंस्था कायम प्रयत्नशील असून सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात सभासदांना ८ टक्के लाभांश देणार येणार असल्याची घोषणा चेअरमन रणजित कदम यांनी केली़

उस्मानाबाद येथे तालुका शिक्षक पतसंस्थेच्या कार्यालयात शनिवारी (दि़२५) वार्षीक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली़ सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे मार्गदर्शक उत्तम नाडे तर प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक ‘पुण्य नगरी’चे जिल्हा वृत्तसंपादक तथा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, शिक्षक नेते विकास मगर, आप्पा लगदिवे,  खुद्बुद्दीन शेख यांची प्रमुख उपस्थिती होती़ सभेस सरस्वती पुजनाने प्रारंभ करण्यात आला़ कार्यक्रमात सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षिका व तालुका शिक्षक रत्न पुरस्कार प्राप्त शिक्षक सभासदांचा सन्मान करण्यात आला़ तसेच संस्थेच्या उपस्थित व आॅनलाईन सभासदांना सहकार बोर्डाचे श्री़ जाधव यांनी शिक्षकांना प्रशिक्षण दिले़ तसेच सभासदांच्या हितासाठी सर्व आर्थिक व्यवहार संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत असून आॅनलाईन सॉप्टवेअरचे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले़ यावेळी संस्थेचे अध्यक्ष रणजित कदम, उपाध्यक्ष शहा तय्यबअली महेबुब, संचालक बाबासाहेब चौरे, राजकुमार माने, प्रविण इंगळे, प्रशांत माने, दिपक ठोंबरे, प्रकाश खडके, एस़ सी़ मुंडे, सुलभा माने, भास्कर गोरे, शहाजी निंबाळकर, प्रशांत पाटील, विश्वंभर माने, मुख्तार पटेल, रविंद्र कुदळे, राजेंद्र चव्हाण आदींसह सभासद, शिक्षक उपस्थित होते़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष रणजित कदम, सुत्रंसचालन प्रशांत पाटील तर आभार प्रविण माने यांनी केले़


 
Top