उस्मानाबाद / प्रतिनिधी-

आयएमए महाराष्ट्र व उस्मानाबाद शाखेच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.३) एक दिवसीय न्यायवैद्यक शास्त्राची राज्य परिषद आभासी पद्धतीने होणार आहे.न्यायवैद्यक व विधी क्षेत्रातील नामवंत तज्ञ देशभरातून सहभागी होणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश पेटकर, पोलिस अधीक्षक निवा जैन, जिल्हा शल्यचिकित्सव डॉ. डी. के. पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, आयएमए प्रदेशाध्यक्ष डॉ. रामकृष्ण लोंढे, पदाधिकारी उपस्थित राहतील, असे चेअरमन डॉ. अभय शहापूरकर, अध्यक्ष डॉ. सचिन देशमुख व ऑर्गनायझिंग सेक्रेटरी डॉ. मिलींद पोळ यांनी सांगितले.


 
Top