तुळजापूर / प्रतिनिधी - 

 तुळजापूर तालुक्यात पुर्वा नक्षञाने धुवाधार बरसात केली असुन तुळजापूर तालुक्याची पावसाची सरासरी 8 47.10 मिमि असताना आजपर्यत 790.6 मिमि म्हणजे आजपर्यतच्या सरासरीच्या 129.72 मिमि इतका पाऊस झाला. सोमवारी राञी तालुक्यात 56 मिमि पाऊस झाला. 

तुळजापूर तालुक्यात ६  दिवसात 150 मिमि पाऊस झाला. तुळजापूर तालुक्यात मागील सहा दिवसात एक दिवसाआड तुफान पाऊस बरसला.  सोमवारी राञी धुवाधार पाऊस पडल्याने नळदुर्ग येथील नरमादी धबाधब्या पुलावरुन  पाणी वाहले. 

या पावसात सोयाबीन,  कांदा, मुग, उडीद  या हाती आलेल्या खरीप पिकाचेे होत्याचे नव्हते झाले.द्राक्ष बागाला ही मोठा फटका बसला तुळजापूर खुर्द जवळील पुलाचे मोठे नुकसान झाले. सरकारने नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

 
Top