तुळजापूर / प्रतिनिधी - 

उस्मानाबाद जिल्हयामध्ये गेली आठ दिवसापासुन होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेले पिक पुर्णपने वाया गेल्याने तसेच पावसाचे प्रमाण अधिक असल्याने उस्मानाबाद जिल्हयामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून शेतक - यांना तात्काळ मदत करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जुन्या बसस्थानक समोरील चौकात रस्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे सुमारे अर्धा तास वाहतूक विस्कळीत झाली होती. 

यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे म्हणाले की, आमच्या मागण्यांचा गाभीर्य पुर्वक विचार न केल्यास संघटना रस्तावर उतरल्या शिवाय राहणार नाही,  असा इशारा रस्ता रोको आंदोलन दरम्यान दिला .

  या आंदोलनात  मंहत मावजीनाथ बुवा, जिल्हाध्यक्ष रविंद्रइंगळे राजामामा भोसले कल्याण भोसले नेताजी  जमदाडे गुरुदास भोजने राजाभाऊ हाके धनाजी पेंदे प्रदीप जगदाळे अदि पदाधिकारी पाचशे शेतकरी यात सहभागी झाले होते. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता.


 
Top