तुळजापूर / प्रतिनिधी-

तालुक्यातील काक्रंबा ग्रामपंचायतचा  उपसरपंचपदी आ. राणा पाटील समर्थक अनिल बंडगर यांची बुधवार दि.२२रोजी झालेल्या निवाडणुकित निवड झाली.  अनिल बंडगर यांना सात विरुद्ध उमेदवारास  चार मते मिळाली.

 पूर्वीच्या  उपसरपंच यांचा नियोजित कार्यकाल संपुष्टात आल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे  पंचायत समितीचे विस्तार अधिकारी  भांगे यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया  पार पडली. नुतन उपसरपंच अनिल बंडगर यांच्या पत्नी वर्षा बंडगर या सरपंच आहेत तर पती उपसरपंच झाल्याने हे पती पत्नी आता गावचा कारभार हाकणार आहेत.

 यावेळी सरपंच वर्षा बंडगर, नागनाथ कानडे, माजी नगराध्यक्ष बापूसाहेब कणे, पंचायत समिती सदस्य शिवाजी गोरे, हरिदास वट्टे,  शहाजी नन्नवरे, सुनील कानडे, महेश सुरवसे, बाळू बंडगर, सोमा खताळ, विनोद साबळे , प्रशांत बंडगर, महादु शिंदे, मेघराज साबळे,  विठ्ठल लोखंडे, अमोल बंडगर, विशाल मस्के, फुलचंद कोळेकर, बालाजी कोळेकर, आप्पाराव सरक, विपुल कंदले,  नितीन पाटील, शिवाजी सुरवसे, समाधान पाटील, शशिकांत पांडागळे, अजित गडदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top