मुरुम / प्रतिनिधी

 मदत नव्हे, हे आमचे कर्तव्यच आहे. या जाणीवेतून उमरगा येथील बहुजन हिताय विद्यार्थी वस्तीगृहाकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

 अजूनही सर्वत्र कोरोना संसर्गाची भीती नागरिकांमध्ये आहे. काहीं कुटूंबियांना कुठलाच आधार नाही. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. काहींचे व्यवसाय, उद्योगधंदे बंद पडले आहेत.  संकटाच्या काळात गोर-गरीब, विधवा, वृद्ध, अंध, अपंग, कष्टकरी कुटूंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे, अशा कुटूंबियांना जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे वाटप सिध्दार्थ कॉलनीत बुधवारी (ता. १८) रोजी महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक धम्ममित्र राम कांबळे, सुनीता कांबळे, धम्मचारी प्रज्ञाजीत, धम्मचारी आर्यघोष आदिंची उपस्थिती होती. अमर कांबळे, बळीराम भालेराव, प्रज्वल कांबळे, सुनिल भालेराव, अभिजीत कांबळे, मनोज हावळे, गौरव कांबळे, शिवाजी कांबळे आदींनी पुढाकार घेतला.                                                                  

 
Top