उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातल्याने मानवाची संपूर्ण जीवनशैलीच बदलून गेली.कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाकडे सख्या नातेवाईकांनी सुद्धा पाठ फिरवली.

 एवढे विदारक चित्र समाजात पाहायला मिळाले. प्रत्येक वेळा मास्क घालने सॅनिटायझर वापरणे  आणि त्याचा वापर होतोय का नाही हे पाहणे ,हीच एक जटील समस्या बनली. कारण जो तो या छोट्याशा विषाणूने घाबरला होता. यालाच पर्याय म्हणून येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या विद्यार्थ्यांनी यावर पर्याय म्हणून त्यांच्या प्रोजेक्टचा एक भाग म्हणून चक्क काम करणारा रोबोट मिस मास्की या  सुंदर नावाने नुकताच तयार केला. 

इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या या परिश्रमाचे कौतुक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने म्हणाले की, सद्य परिस्थितीत अत्यंत उपयुक्त असा रोबोट आमच्या विद्यार्थ्यांनी बनविला असून हा मोशन सेन्सिटिव्ह आहे. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या हालचालीवर लक्ष ठेवतो. व्यक्तीने मास्क घातला किंवा नाही हे तपासून तात्काळ सूचना करतो .तसेच व्यक्तीच्या अंगातील तापमानाची नोंद सुद्धा  आपल्याला दाखवत असून त्यामुळे पुढील संभाव्य अनर्थ टळू शकतो. तसेच हा रोबोट येणाऱ्या प्रत्येकाला हात धुण्यासाठी सॅनिटायझर देत असून त्याबरोबरच प्रत्येकाचे स्वागत सुद्धा करत आहे. अत्यंत अल्प किमतीत बनवलेल्या हा रोबोट भविष्यात नक्कीच सार्वजनिक ठिकाणी, रूग्णालयात फायदेशीर ठरेल हा विश्वास वाटतो. तसेच या प्रोजेक्ट मुळे विद्यार्थ्यांनी हे सिद्ध केले की ग्रामीण भागात सुद्धा महाविद्यालयाने वेळोवेळी चांगली संधी देऊन त्यांच्यातील कौशल्यास वाव दिलेला आहे .यावेळी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाचे विभाग प्रमुख प्रा एस जी शिंदे ,  प्रोजेक्ट समन्वयक प्रा श्रीकांत अघोर ,प्रा अनिरुद्ध देशपांडे , डॉ.पवनकुमार पाईकराव ,श्री व्ही डी पवार , श्री.सचिन शेळवणे,प्रकाश महाजन यांची उपस्थिती होती .इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या तृतीय आणि अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या या रोबोटचा नक्कीच सार्वजनिक ठिकाणी उपयोग होईल असा विश्वास विद्यार्थ्यांनी या वेळी व्यक्त केला.


 
Top